फेक न्यूज बद्दल एबीपी माझाच्या राजीव खांडेकरांना नोटीस
 

कोरोना लासिकरणाबद्दल खोटी बातमी पसरवल्याबद्दल एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर ह्यांना LRO तर्फे नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

राजीव खांडेकर ह्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून एक ट्विट केले. ज्यात त्यांनी कोरोना च्या लसीचे डोस देण्यात केंद्र सरकार भेदभाव करत आहे असे लिहिले. पुढे असेही लिहिले की महाराष्ट्राला लसीचे ७ लाख ४० हजार डोस देण्यात येणार असून उत्तर प्रदेशाला ४४ लाख डोस. हा पक्षपात असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

 

Legal Rights Observatory ह्या सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या संघटनेने खांडेकर ह्यांच्या ह्या ट्विट बद्दल त्यांना कायदेशीर कार्यवाहीचा इशारा दिला आहे.

 

केंद्राने महाराष्ट्राला १ कोटी ६ लाख डोस एवढा पुरवठा केला आहे. परंतु खांडेकरांनी मात्र केवळ ७.४ लाख डोस मिळत असल्याचे खोटे वृत्त पसरवले आणि एबीपी माझा ह्या वाहिनीने देखील हे खोटे वृत्त पसरवले. ह्यामुळेच आपण खांडेकरांना नोटीस देत असल्याचे LRO तर्फे सांगण्यात येत आहे.

   

साथरोग कायदा, भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ह्यातील तरतुदींखाली अशा अफवा पसरवणे हा गुन्हा आहे आणि त्यामुळे खांडेकर व एबीपी माझा यांच्याविरुद्ध आपण कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचेही LRO तर्फे सांगण्यात आले.

4 thoughts on “फेक न्यूज बद्दल एबीपी माझाच्या राजीव खांडेकरांना नोटीस

  1. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्ती समाजात गैरसमज पसरवतात तेंव्हा त्या त्वरित कायदा दाखवून शिक्षा करायला हवी.

  2. हे या चॅनेल चे नेहमीचे धंदे आहेत.. एका विशिष्ठ राजकीय पक्षाविरोधात आणि समाजा विरोधात कसा narrative set करता येईल अशा प्रकारच्या बातम्या आणि त्याच्या headlines असतात. निष्पक्ष बातम्या देत नाहीत.

  3. ABP माझा व ह्या नतभ्रष्ट खांडेकरला ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे.. हा विकाऊ चैनल आहे.. मागील वेळेस सावरकरांबद्दल नायक /खलनायक शब्द वापरुन याने याची वैचारीक आणि मानसिक दिवाळखोरी दाखविली होती.. याला चैनल मधुन हाकलणे जरुरीचे आहे.. व चैनेल्स सुद्धा बंद होणे आवश्यक आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!