आज जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ठाकरे सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परम बीर सिंह ह्यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमली आहे.
ह्या एक सदस्यीय समितीवर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री कैलास चांदिवाल ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह ह्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे ह्याच्यामार्फत खंडणी वसुली करत असल्याचे आरोप एका पत्राद्वारे केले होते. ह्यानंतर देशभर ह्या प्रकरणामुळे खळबळ माजली होती.
आपण केलेल्या आरोपांचे तथ्य तपासून बघण्यासाठी ह्या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका परम बीर सिंह ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. ह्या याचिकेवर उद्या ( बुधवारी ) सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर अखेर आज महाराष्ट्र सरकारने देशमुखांच्या चौकशीचा आदेश जारी केला आहे. ह्या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
व्होरा कमिटीचा रिपोर्ट उघड करा कशाचीच गरज पडणार नाहो