सचिन वाझे वर UAPA अंतर्गत कारवाई होणार
 

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घराबाहेर रस्त्यावर एका गाडीत स्फोटके आढळून आली होती. ह्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ह्या राष्ट्रीय तपास एजन्सी कडून आरोपी सचिन वाझे ह्याला ताब्यात घेण्यात आले होते. आता NIA कडून वाझे विरुद्ध UAPA ह्या कायद्यातील कलमे लावण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

 

UAPA म्हणजेच Unlawful Activities Prevention Act हा कायदा देशविरोधी, दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा आहे. ह्या कायद्या अंतर्गत अटक झालेल्या एखाद्या आरोपीला जामीन मिळणे अत्यंत अवघड असते.

 

भर शहरात स्फोटके ठेवून गाडी उभी करणे हे कृत्य केल्याने वाझे ह्याच्यावर आता UAPA लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या तुरुंगातून सुटकेची आशा धूसर होणार आहे.

 

वाझे प्रकरणाला विविध कंगोरे असल्याचे रोज बाहेर येणाऱ्या नवनवीन बातम्यांमुळे समजते आहे. त्यामुळे NIA सह इतरही केंद्रीय तपास यंत्रणा ह्या प्रकरणांमध्ये काय भूमिका घेतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!