शिक्षण आनंदी व्हावे म्हणून वसतिगृहांचे नाव होणार ‘मातोश्री’
 

महाराष्ट्र सरकारने नुकताच एक अजब निर्णय घेतला आहे. राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व वसतिगृहांचे नाव ' मातोश्री ' करण्याचा हा निर्णय आहे.

 

विद्यार्थ्यांचे शिक्षण सहज व आनंददायी व्हावे आणि पालकांच्या मनात मुला मुलींना शासकीय वसतिगृहात ठेवण्याबाबत विश्वास निर्माण व्हावा ह्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे ह्या GR मध्ये म्हणले आहे.

  Maharashtra govt GR for govt hostel name  

आत्ता अस्तित्वात असलेल्या ज्या वसतिगृहांत कोणते विशिष्ट नाव नाही त्यांचे नाव आता ' मातोश्री वसतिगृह ' असेल. तसेच भविष्यात बांधण्यात येणाऱ्या सर्व वसतिगृहांचे हेच नाव असेल.

 

उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय, अकृषी विद्यापीठ अशा सर्व विद्यापीठांच्या शासकीय वसतिगृहांना हा निर्णय लागू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!