भारताच्या संविधान निर्मितीत योगदान देणाऱ्या १५ महिला
 

भारताच्या संविधान निर्मितीसाठी निर्वाचित संविधान सभेत १५ महिला सदस्य होत्या. त्यांचे संविधान निर्मितीतील योगदान महत्त्वाचे आहे.

 
कोण होत्या ह्या १५ महिला?
   

लिला रॉय ह्या सुभाष चंद्र बोस ह्यांच्या अनुयायी होत्या. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेतला. त्या बंगाल मधून संविधान सभेत निवडून गेल्या. परंतु त्यांनी देशाच्या फाळणीचा निषेध म्हणून संविधान सभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

     

ऍनी ह्यांनी संविधान सभेत त्रावणकोर आणि कोची ह्या संस्थानचे प्रतिनिधित्व केले. इतिहासात एम. ए. करून त्या श्रीलंकेत प्राध्यापकाचे काम करत होत्या. भारतात परत येऊन त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली. त्यांनी संविधान सभेत देशात शक्तिशाली केंद्र असलेले संघराज्य असावे असे मत मांडले होते.

     

संविधान सभेत मुंबई मधून निवडून गेल्या. मूलभूत अधिकारांवरिल उपसमितीच्या, सल्लागार समितीच्या सदस्य. समान नागरी कायद्याचे समर्थन केले. महिलांसाठी आरक्षित मतदारसंघांना विरोध केला.

     

संविधान सभेत United Province मधून निवडून गेल्या. राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य म्हणून काम केले. ह्या समितीने संविधान सभेसमोर भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम प्रस्तुत केला. त्यांनी फाळणी नंतरच्या पुनर्वसन कार्यात देखील महत्त्वाचे योगदान दिले.

     

मूलभूत अधिकारांवरिल उपसमिती, अल्पसंख्यांक अधिकारांवरील उपसमिती आणि ३ महत्त्वाच्या समित्यांचे सदस्यत्व भूषवले. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समान नागरी कायद्याचा समावेश व्हावा ह्यासाठी प्रयत्न केले. पुढे स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी १० वर्षे काम केले.

     

United Province म्हणजेच आत्ताच्या उत्तर प्रदेशातून संविधान सभेत निवडून गेल्या. त्या साहित्यिक होत्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी काम केले. स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले.

     

संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला सदस्य. त्यांनी अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित मतदार संघांना विरोध केला. त्यांनी राष्ट्रीय भाषा, अल्पसंख्यांकांचे अधिकार, कॉमनवेल्थ मध्ये राहण्याविषयी चर्चा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये आपले विचार मांडून महत्वाचे योगदान दिले.

     

संविधान सभेत मद्रास प्रांतातून निवडून गेल्या. राष्ट्रीय भाषा, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, मानवी तस्करी ह्या विषयांवरील चर्चांमध्ये महत्त्वाचा सहभाग. संविधान सभेच्या २ समित्यांच्या सदस्य.

     

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित रे ह्या पश्चिम बंगाल मधून संविधान सभेत निवडून गेल्या. त्यांनी महिलांसाठी विशेष अधिकार, आरक्षण ह्याला विरोध केला. त्यांनी सरकारी शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिकवणी देण्यास विरोध केला. त्यांनी अनेक विषयांमधील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

       

जवाहरलाल नेहरू ह्यांची बहीण आणि मोतीलाल नेहरू ह्यांची त्या कन्या. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी भारताच्या राजदूत म्हणून पुढे यशस्वी कारकीर्द घडवली.

       

युनायटेड प्रोविन्स चे प्रतिनिधित्व संविधान सभेत केले. त्यांनी उद्देशिका, राज्य सभेच्या सदस्यत्वासाठी अर्हता आणि प्रतिबंधात्मक तुरुंगवास ह्या विषयांवरच्या चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि आपली मते मांडली.

     

स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे अनेक वेळा अटक आणि तुरुंगवास. ओडिशा मधून संविधान सभेत निवडून गेल्या. परंतु आपल्याला महात्मा गांधींबरोबर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करायचे असल्याचे सांगत सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुढे १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्याने मालतीबाईंना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला.

     

एकमेव दलित महिला सदस्य. हरिजनांसाठी स्वतंत्र मतदार संघाच्या तरतुदीला विरोध केला. अस्पृश्यता, आरक्षण ह्या विषयांवरील चर्चेत महत्त्वाचे योगदान.

     

अम्मु स्वामिनाथन मद्रास मधून संविधान सभेत निवडून गेल्या. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतानाच त्यांनी महिलांना मतदानाचा हक्क मिळावा ह्यासाठी काम केले. संविधान सभेपुढे भाषणात त्यांनी मूलभूत अधिकार आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे ही संविधानाचा गाभा असल्याचे प्रतिपादन केले.

     

स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाचे योगदान. त्या बिहार मधून संविधान सभेत निवडून गेल्या. राष्ट्रध्वज समितीच्या त्या सक्रिय सदस्य होत्या आणि आपल्या भाषणातून त्यांनी संविधान सभेला राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटवून दिले.

   
LawMarathi
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!