२७ फेब्रुवारी खरंच मराठी राजभाषा दिन आहे?: फॅक्ट चेक
 

आज ( २७ फेब्रुवारी ) मराठी राजभाषा दिन, मराठी दिन असे काहीतरी असल्याचे आपल्याला मराठी वृत्त वाहिन्या सांगत आहेत. पण आज खरंच मराठी राजभाषा दिन आहे? जाणून घेऊया...

 
आज म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो.
तर १ मे हा दिवस ' राजभाषा मराठी दिन' म्हणून साजरा होतो. १ मे ह्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाल्याने हा दिवस राजभाषा दिन म्हणून  साजरा केला जातो.
   

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला. त्याविषयीचा हा शासन निर्णय

GR marathi bhasha gaurav din

तर १ मे हा दिवस राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करण्यात येईल हा निर्णय महाराष्ट्र शासनाने १० एप्रिल १९९७ ह्या दिवशी घेतला होता­. त्याविषयीचा हा शासन निर्णय,

  GR marathi rajbhasha din  

मराठी माणसाला ह्या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांविषयी अचूक माहिती असावी ह्यासाठी LawMarathi चा हा प्रयत्न.

 

आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!