मुंबई हाय कोर्टाने न्यायाधीश पदासाठी पाठवलेल्या २२ नावांना मंजुरीची शक्यता धूसर

मुंबई हाय कोर्टाकडून न्यायाधीश पदासाठी १८ वकील आणि ४ कनिष्ठ न्यायाधीशांच्या नावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम कडे करण्यात अली होती. परंतु ह्या नावांना सर्वोच्च न्यायालयाचा विरोध असल्याचे वृत्त समजते आहे.

 

उच्च न्यायालयासाठी न्यायाधीशांनी नेमणूक करण्याच्या प्रक्रियेनुसार आधी उच्च न्यायालयाकडून नावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयात पाठवली जाते. Collegium कडून ही नावे पडताळली जातात, त्यावर विचार विनिमय होतो आणि मग योग्य वाटल्यास ह्या नावांची शिफारस सरकारकडे करण्यात येते आणि सरकार ही शिफरास स्वीकारून न्यायाधीशांनी नियुक्ती करते. ह्या प्रक्रियेत त्या त्या हाय कोर्टातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेल्या न्यायमूर्तींच्या मताचाही collegium विचार करते.

 

मुंबई उच्च न्यायालयाने पाठवलेल्या २२ नावांवर collegium ने मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या न्या. खानविलकर, न्या.चंद्रचूड आणि न्या. गवई ह्यांच्याशी सल्लामसलत केल्याचे समजते. ह्या तिघांनी ह्या सर्व २२ नावांना विरोध केला असल्याचे वृत्त आहे. ह्या विरोधाचे कारण म्हणजे ह्या नावांच्या सचोटी विषयी, प्रामाणिकपणा विषयी न्यायमूर्तींना संपूर्ण खात्री नसल्याचे समजते.

 

तसेच ह्या २२ नावांची निवड घाईघाईत केलेली असणे हे सुद्धा collegium च्या विरोधाचे एक कारण असल्याचे समजते. २० मार्च २०२० ते २७ एप्रिल २०२० ह्या कालावधीत न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी आपल्या ह्या ३९ दिवसांच्या कार्यकाळात ही यादी तयार केली. एवढ्या कमी वेळात इतक्या महत्त्वाच्या पदासाठी तब्बल २२ नावांची यादी कशी तयार झाली ह्यावर न्या. चंद्रचूड आणि न्या. खानविलकर ह्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. अशी शिफारस करण्यासाठी आधी उमेदवारांच्या कार्यक्षमतेची, सचोटीचा संपूर्ण खात्री करून घेणे आवश्यक असते. इतक्या घाईघाईत हे करणे योग्य नाही असे मत ह्या न्यायमूर्तींनी व्यक्त केले आहे.

 

न्या. चंद्रचूड आणि न्या. खानविलकर ह्यांनी स्वतंत्र पत्रे लिहून ही सर्व नावे पुनर्विचारासाठी परत पाठवून देण्यात यावी असे ठाम मत व्यक्त केले आहे.

त्यामुळे आता collegium कडून ही नावे स्वीकारली जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदे ९४ असून ह्यापैकी ३० पदे रिक्त आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!