यूपीएससी साठी एक संधी वाढवून मिळणार? वाचा काय झाला निर्णय
 

यूपीएससी परीक्षेसाठी ऑक्टोबर २०२० मध्ये ज्यांनी आपला शेवटचा attempt दिला, अशा उमेदवारांना एक संधी वाढवून द्यावी ही मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२० मध्ये शेवटची संधी असलेल्या उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे ह्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

 

ह्या याचिकेच्या सुनावणीत कोर्टाने केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग ह्यांना याचिकाकर्त्यांच्या मागणीवर विचार करायला सांगितले होते. त्यानंतर केंद्राने ऑक्टोबर २०२० मध्ये शेवटचा attempt दिलेल्या उमेदवारांना एक अधिक संधी देण्याची तयारी दाखवली होती. यूपीएससी साठी एक अटेम्प्ट वाढवून द्यायला सरकार तयार

परंतु वयाची मर्यादा शिथिल न करण्याचे केंद्राचे म्हणणे होते. ह्या प्रस्तावाला याचिकाकर्त्यांनी मान्यता न दिल्याने अखेर कोर्टाला ही याचिका कायद्याच्या कसोटीवर ( on merits ) ठरवणे भाग पडले.

 

ह्या उमेदवारांना एक संधी वाढवून दिली तर इतरही उमेदवार अशीच सवलत मागतील आणि हे चक्र चालूच राहील असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

 

आज न्या. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. अजय रस्तोगी ह्यांच्या खंडपीठाने अखेर ह्या प्रकरणात अंतिम निर्णय देत याचिका फेटाळली.

 

त्यामुळे आता २०२० मध्ये ज्या उमेदवारांनी आपला UPSC परीक्षेचा अंतिम attempt दिला, त्यांना एक वाढीव संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!