शिवप्रेमींना मोदी सरकारतर्फे शिवजयंती निमित्त खास भेट
 

उद्या देशभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. ह्या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारने शिवप्रेमींनी एक खास भेट दिली आहे.

 
काय आहे ही खास भेट?
 

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या Archeological Survey of India कडून रायगडावर जाण्यासाठी आकारले जाणारे शुल्क शिवजयंती निमित्त १८ आणि १९ तारखेला आकारले जाणार नाही. शिवप्रेमींनी हे दोन्ही दिवस रायगडावर कुठलेही शुल्क/ फी न भरता जाता येईल आणि महाराजांना मनाचा मुजरा घालता येईल.

  Shivjayanti ASI  

रायगड ही पुरातन वास्तू आणि सांस्कृतिक वारसा असल्याने त्याचे संरक्षण Archeological Survey of India ची जबाबदारी आहे. रायगडाची निगा राखण्यासाठी ASI गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींकडून काही शुल्क घेत असते. ह्या रकमेचा उपयोग गडाचे संरक्षण, संवर्धन, डागडुजी अशा कामांसाठी केला जातो. पण आज आणि उद्या शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमी हे शुल्क न देताच रायगडावर जाऊ शकतील.

 

एकीकडे राज्य सरकार शिवजयंती उत्सव रोज नवे निर्बंध घालत असताना केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि त्याचे शिवप्रेमींकडून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!