फोन कॉल रेकॉर्डिंग्ज पुरावा असू शकतात का?
   

पूजा चव्हाण प्रकरणाने अनेक फोन रेकॉर्डिंग्ज समोर आणली आहेत. रोज आपण कोणतीतरी रेकॉर्डिंग्ज ऐकतच आहोत.

 

या लेेखातून आपण समजून घेऊया की, अशा स्वरूपाची फोन कॉल रेकॉर्डिंग्ज पुरावा म्हणून कोर्टात सादर केली जाऊ शकतात का?

   

तसेच या कॉल रेकॉर्डिंग्जसारख्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा होऊ शकते का?

 

फोन कॉल रेकॉर्डिंग्ज कोणत्याही केसमध्ये पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकतात;

पण

अशाप्रकारे रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिप्ससोबत कोणतीही छेडछाड केलेली चालत नाही.

   

म्हणजेच ज्या स्वरूपात एखादा कॉल रेकॉर्ड झाला आहे, त्याच स्वरूपात, format मध्ये ती फाईल असली पाहिजे.

   

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65B नुसार एक प्रमाणपत्र अशा स्वरूपाच्या पुराव्यासोबत जोडले गेले पाहिजे. हे प्रमाणपत्र रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीकडून घेतले जाते. त्यात ही फाईल कोणत्या device वर रेकॉर्ड करण्यात आली तसेच कधी, कोणत्या ठिकाणी, किती वाजता रेकॉर्ड झाली , असे तपशील लिहावे लागतात.

   

जर आवाज स्पष्ट ऐकू येत असेल, ऑडिओ फाईलसोबत कोणत्याही स्वरूपाची छेडछाड/ काटछाट/ editing झाले नसेल, तर हा पुरावा गाह्य धरला जाऊ शकतो.

 

परंतु अशा स्वरूपाच्या पुरव्याला काही Corroborative Evidence किंबहुना पूरक ठरेल असा आणखीन कोणता पुरावा आहे का, याचाही विचार केला जातो.

 

तसेच रेकॉर्डिंग मध्ये ज्या व्यक्तींचा आवाज असल्याचा दावा केला जाईल, त्याच व्यक्तींचा तो आवाज आहे हे देखील सिद्ध करावे लागते. ही recordings व्यवस्थित सीलबंद असावी लागतात. त्याबरोबर छेडछाड झाली आहे असा दावा जर कोणत्याही संबंधित पक्षाने केला तर तसे झालेले नाही हे सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये चिकित्सेसाठी पाठवावे लागते. त्याचा रिपोर्ट कोर्टात सादर करावा लागतो आणि वेळप्रसंगी हा रिपोर्ट तयार करणाऱ्या फॉरेन्सिक तज्ञाला कोर्टात साक्ष द्यावी lagu शकते.

 

म्हणजेच ऑडियो किंवा फोन रेकॉर्डिंग कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत असले तरी कोर्ट त्याची संपूर्ण खातरजमा करूनच त्यावरून काही निष्कर्ष काढता येतात की नाही हे ठरवते.

 

आजवरच्या अनेक खटल्यांमध्ये यावर खल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!