मुंबई महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करणारी याचिका भारतीय जनता पक्षाचे BMC गटनेते प्रभाकर शिंदे ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
२०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यावेळी महापौरांनी विरोधीपक्षनेतेपद भाजप ला देऊ केले होते. परंतु त्यावेळी भाजप ने ते नाकारले होते. त्यानंतर महापौरांनी हे पद तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस ला देऊ केले. काँग्रेस ने ते स्वीकारून रवी राजा ह्यांना BMC विरोधीपक्षनेते पदी बसवले. २०२० मध्ये भाजप गटनेते प्रभाकर शिंदे ह्यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करून आपल्याला विरोधीपक्षनेतेपद मिळावे अशी मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे शिंदे ह्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली.

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पहिल्यांदा ऐकल्यावर आश्चर्य व्यक्त केले होते. विरोधीपक्षनेते सत्ताधारी पक्षाचेच कसे असा सवालही केला होता. सत्ताधारी पक्षाचाच विरोधी पक्षनेता?- बीएमसी ला सुप्रीम कोर्टाचा सवाल
पण ह्या याचिकेत कायदेशीर दृष्ट्या फार तथ्य न आढळल्याने ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
शिंदे ह्यांना भाजप च्या लीगल सेल कडून योग्य सल्ला मिळाला नसावा असा अंदाज आता व्यक्त होत आहे. BMC ची निवडणूक जवळ असताना हा धक्का बसल्याने भाजप नगरसेवक आता पुढे काय करणार हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.