मिसा कैदी ते हाय कोर्ट जज; जाणून घेऊया त्यांच्याविषयी
 

नुकतेच 16 फेब्रुवारी 2021 रोजी माजी राज्यपाल एम. रामा जॉईस यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते.

       

­86 वर्षाच्या आयुष्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

 

एका हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, राज्यसभा खासदार आणि दोन राज्याचे राज्यपालपद भूषविणारे एम. रामा जॉईस एकेकाळी तुरुंगातही गेले होते.

 

जॉईस यांचा जन्म 27 जुलै 1931 रोजी झाला.

 

त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणीबाणीविरोधात केलेल्या आंदोलनामुळे.

  Jois  

इंदिरा गांधींनी देशभर आणीबाणी लागू केली. त्याविरोधात अनेक लोकशाहीवादी लोकांनी सत्याग्रह केला.

    एम. रामा जॉईस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी देखील या सत्याग्रहात सहभाग घेतला. त्यांना इंदिरा सरकारने अटक करून बँगलोर सेंट्रल जेलमध्ये ठेवलं होतं.    

या बँगलोर सेंट्रल जेलमध्ये समाजवादी नेते मधू दंडवते, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीदेखील होते.

   

रामा जॉईस यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. ते सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ झाले.

   

त्यांनी सर्व्हिस लॉ, कॉन्स्टिट्युशनल लॉ याविषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

   

3 मे 1992 ते 32 ऑगस्ट 1992 ते पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते.

   

अस म्हणतात की, त्यांचे नाव सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी डावलण्यात आले तेव्हा त्यांनी हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला होता.

  Rama Jois  

रामा जॉईस 12 जून 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 बिहारचे राज्यपाल होते.

   

त्यापूर्वी 15 जुलै 2002 ते 11 जून 2003 झारखंडचे राज्यपाल होते.

  Legal & Constitutional History of India  

त्यांनी 'लीगल अँड कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री ऑफ इंडिया' असे दोन खंड लिहिले. त्यापैकी एक खंड वकिलीच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक आहे.

   

त्यांनी लिहिलेली पुस्तके:

 

Services under the State (1974)

 

Legal and Constitutional History of India (1982)

 

Historical Battle (1977)

 

Dharma : The Global Ethic (English, Hindi and Kannada) (1996)

 

Ancient Indian Law : Eternal values in Manu Smrithi (English, Kannada, Hindi)(2003)

 

Trivarga Siddantha (English and Kannada) (2005)

 

The Bharathiya way to lead Purposeful life (English and Kannada) 2007

 

National Reconciliation for Harmonious Living (2008)

 

Code of Conduct for Rulers (English and Kannada) 2008

 

Raja Dharma with lessons on Raja neethi

 

Need for Amending the Constitution

   

एम. रामा जॉईस 2008 ते 2014 राज्यसभेचे खासदार होते. राज्यसभेत सर्वाधिक उपस्थिती जॉईस यांची होती. अनेकदा तर १००% उपस्थितीची नोंद त्यांच्या नावाने आहे.

   

अशा या महान व्यक्तिमत्वाचा अस्त 16 फेब्रुवारी 2021 रोजी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!