FASTag नसेल तर उद्यापासून भरावा लागणार दुप्पट टोल
 

तुमच्या चारचाकी वाहनाला FASTag नसेल तर उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी च्या मध्यरात्रीपासून तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज ही घोषणा केली आहे.

उद्या मध्यरात्रीपासून चारचाकी किंवा त्याहून मोठी प्रवासी आणि मालवाहू वाहने जर FASTag शिवाय रस्त्यावरून जात असतील तर टोल पलाझावर ह्या वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागेल. ह्यापूर्वी नितीन गडकरी ह्यांनी FASTag बंधनकारक करण्याची घोषणा केली होती. परंतु FASTag लावून घेण्यासाठी मुदतवाढ दिल्याने हा नियम अजून लागू झाला नव्हता. आता मात्र प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा च्या सर्व रांगा ( लेन ) ह्या FASTag असलेल्या वाहनांसाठीच असतील. आणि तो नसल्यास दुप्पट रक्कम टोल म्हणून भरावी लागेल.

 

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ नुसार FASTag विरहित वाहनांना दुप्पट शुल्क भरावे लागण्याची ही तरतूद करण्यात आली आहे.

 

डिजिटल माध्यमातून शुल्क भरण्यास चालना मिळावी ह्या उद्देशाने केंद्र सरकारने हा नियम केला आहे.

 

त्यामुळे तुमच्या वाहनाला FASTag नसेल, तर त्याची तरतूद करून घेणे आता अनिवार्य झाले आहे. आणि ते करण्यासाठी आता फक्त उद्या मध्यरात्रीपर्यंतचा तुमच्या हातात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!