पाकिस्तान कोर्टाने का बॅन केला व्हॅलेंटाईन डे? (वाचा सविस्तर)
 

हल्ली व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) साजरा करण्याची फैशन आहे. त्यातही व्हॅलेंटाईन डे सोबत रोज डे, प्रॉमिस डे, गिफ्ट डे, असा पूर्ण आठवडा साजरा केला जातो. परंतु अगदी सहजरित्या करीत असलेले तुमचे हे सेलिब्रेशन (Celebration) पाकिस्तानमध्ये शक्य नाही.

   

पाकिस्तानमध्ये तर खुद्द कोर्टाने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याविषयी सुनावणी घेतली होती. व्हॅलेंटाईन डे विरोधात केस केली होती, अब्दुल वाहिद नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाने. इस्लामाबाद हाय कोर्टात या केसवर सुनावणी झाली.

 

'व्हॅलेंटाईन डे' हा इस्लामिक परंपरेच्या विरोधी आहे. तसेच 'व्हॅलेंटाईन डे' विषयी मीडिया, सोशल मीडियातील उदात्तीकरण ( pramotion) इस्लामिक शिकवणुकीच्या विरुद्ध आहे, म्हणून यावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.

   

इस्लामाबाद हाय कोर्टाचे न्यायमूर्ती शौकत अजीज यांनी या केसवर निर्णय दिला. त्यांनी ताबडतोब पाकिस्तानातील सर्व मीडिया हाऊसना व्हॅलेंटाईन डे विषयीचे सर्व कार्यक्रम थांबवायला लावले.

 

तसेच कोर्टाने पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी औथोरिटी (Pakistan Electronic Media Regulatory Authority- PERMA) यांना सगळ्या मीडियावर लक्ष ठेवायला सांगितले होते.

   

व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका असे आवाहन पाकिस्तानी राष्ट्रपती ममनुन हुसैन यांनी 2016 साली केले होते.

   

त्यानंतर 2017 साली याविषयी थेट एक केस फाईल करण्यात आली. व्हॅलेंटाईन डे वर बंदी घालावी अशीही मागणी या केसमध्ये करण्यात आली होती.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!