मुंबईतील विशेष PMLA कोर्टाने आज ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर ह्यांना जामीन दिला आहे.
कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि इतर ९ व्यक्तींवर PMLA अंतर्गत मनी लाँडरिग चे आरोप आहेत. कोचर ह्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत व्हिडिओकॉन ला अवैधरीत्या कर्ज दिले आणि त्या बदल्यात आपल्या पतीच्या कंपनी मार्फत लाच घेतली असे त्यांच्यावर आरोप आहेत.
ह्याच प्रकरणात कोचर ह्यांच्या पतीला यापूर्वीच अटक झाली होती. चंदा कोचर आज कोर्टाच्या आदेशानुसार सुनावणीसाठी हजर झाल्या.
कोर्टाने त्यांना ५ लाख रुपयांच्या बाँड वर जामीन मंजूर केला. तसेच त्यांना कोर्टाच्या पूर्वपरवानगी शिवाय देश सोडून न जाण्याचे निर्देशही दिले.