प्रा. शिरीष देशपांडे ह्यांच्या निधनाने कायदेविश्व हळहळले
 

विधीविश्वात सर्वश्रुत असलेले आदरणीय प्राध्यापक शिरीष देशपांडे ह्यांचे १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले.

 

प्रा. देशपांडे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर येथे कार्यरत होते. विद्यापीठाने ११ फेब्रुवारी रोजी श्रद्धांजली सभा आयोजित करून आपल्या ह्या विद्यार्थीप्रिय शिक्षकाला आदरांजली वाहिली.

 

आपल्या अंधत्वावर मात करून शिरीष देशपांडे ह्यांनी विधी क्षेत्रात मोठे योगदान दिले. ते संविधानाचे गाढे अभ्यासक होते. त्यांचे शोधनिबंध, लेख अनेक सन्माननीय जर्नल्स, रिपोर्ट्स मध्ये प्रकाशित झाले. त्यांनी Disability Rights च्या क्षेत्रातही मोलाचे काम केले.

 
प्रा. देशपांडे ह्यांची काही सन्माननीय प्रकाशने
   
  • S.L.Deshpande and P.P.Craig – “Rights, Autonomy and Process : Public Interest Litigation in India”, Autumn 1989 Oxford Journal of Legal Studies, Vol-9, No.3. (ISSN No. 0143-6503, Impact Factor 0.328)
 
  • Dr. S.L.Deshpande – “Decolonizing the Mind : A Legal Perspective”, 1998, International Journal of Cultural Studies. (2011 Impact Factor 0.409) 
 
  • Sanjay Jain & Shirish Deshpande (2019) Public law foundation of the doctrine of legitimate expectations in India, Indian Law Review, 3:1, 61-96, DOI: 10.1080/24730580.2019.1613813
 

त्यांच्या डॉ. संजय जैन यांच्याबरोबर लिहिलेल्या ह्या २०१९ मधील लेखाचा उल्लेख न्या. चंद्रचूड ह्यांनी नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात केला.

The Rights of Persons With Disabilities Act ( अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६) च्या निर्मितीतही त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

 

प्रा. देशपांडे ह्यांच्या निधनाने भारताच्या विधी विश्वात मोठी पोकळी निर्माण केली आहे. त्यांची प्रेरणा घेऊन देशात विधी-अभ्यासक कार्यमग्न राहतील ह्यात मात्र शंका नाही. त्यांनी आपल्या जगण्यातूनच विधी विद्यार्थ्यांना खूप कशी शिकवले आहे.

 

प्रा. शिरीष देशपांडे ह्यांना Law Marathi कडून विनम्र श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!