शिवजयंतीला मिरवणुका काढू नका: ठाकरे सरकारचा फतवा
 

महाराष्ट्राच्या महविकस आघाडी सरकारने आज एक शासन निर्णय जारी करत यंदा शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यास मनाई केली आहे.

 
कोरोना चे कारण देत राज्य सरकारने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला मिरवणूक, प्रभात फेरी, बाईक रॅली काढू नये असा आदेश काढला आहे.
शिवजयंती निमित्त सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासही मनाई करण्यात आली आहे. केवळ १० लोकांनी जमून महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्याचे आवाहन ह्या GR मधून करण्यात आले आहे.
 
दर वर्षी १८ तारखेला रात्री १२ वाजता राज्यभरातील शिवप्रेमी गड किल्ल्यांवर जमून महाराजांची जयंती साजरी करतात. पण ह्या वर्षी ते ही करू नये असे सरकारचे निर्देश आहेत.
    Shiv jayanti GR    

राज्यातील हॉटेल्स, सिनेमागृहे सुरू असताना फक्त शिवजयंती साजरी करू इच्छिणाऱ्या शिवभक्तांवर सरकार असे निर्बंध का लादत आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हजारो आंदोलक ठिय्या देऊन बसले आहेत, त्यांना शिवसेना पाठिंबा देत आहे. तेथे कोरोना ची काळजी शिवसेनेला वाटतं नाही. परंतु शिवजयंती साजरी करतानाच सरकार असे जाचक नियम का लावत आहे असे आता शिवप्रेमी नागरिक विचारात आहेत.

 

ह्यावर Law Marathi चा हा व्हिडिओ पहा

One thought on “शिवजयंतीला मिरवणुका काढू नका: ठाकरे सरकारचा फतवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!