झूम फिल्टर मुळे वकीलाचे झाले मांजर
 

अमेरिकेत एक मजेशीर प्रकार घडला. झूम ॲप द्वारे ऑनलाईन सुनावणी चालू असताना एका वकिलाच्या जागी मांजर दिसायला लागले.

 

न्यायाधीशांच्या लक्षात आले की ह्या वकिलाने Zoom वरील Cat Filter लावले आहे. परंतु वकिलाला ते फिल्टर काढावे कसे हेच समजत नव्हते. त्यामुळे वकील बोलत होता परंतु स्क्रीन वर मांजर दिसत होते.

   

ह्या प्रकारान हा वकील चांगलाच खजील झाल्याचे दिसले. परंतु न्यायाधीशांनी समजुतीने घेऊन वकिलाची मदत केली.

 

कोरोना मुळे अनेक देशांत कोर्टाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरू आहे. वकील, न्यायाधीश, अशील सर्वांसाठीच हे माध्यम नवीन आल्याने विविध ठिकाणी असे मजेशीर प्रकार होताना दिसले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!