सनी लिओनी ला कोर्टाकडून संरक्षण
 

अभिनेत्री सनी लिओनी हिला केरळ हाय कोर्टाने अंतरिम संरक्षण दिले आहे. तिने केरळ हाय कोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीत तिला हे अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे.

 

कोर्टाने ह्या प्रकरणात नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी पर्यंत आता सनी हिला अटक होणार नाही.

 

सनी लिओनी विरुद्ध एका इव्हेंट मॅनेजर ने फसवणुकीची तक्रार केली होती. तिने काही कार्यक्रमांना हजार राहण्यासाठी पैसे घेतले परंतु ती हजर राहिली नाही असे आरोप ह्या तक्रारदाराने केले आहेत.

 

सनी ची रविवारी क्राईम ब्रांच कडून चौकशी करण्यात अली होती. अटक होण्याच्या भीतीने सनी ने केरळ हाय कोर्टात धाव घेतली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!