गॅंगस्टर गजानन मारणे ची निर्दोष सुटका
 

पुणे विशेष सत्र न्यायालयाने कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांची खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका केली आहे.

 
काय आहे प्रकरण?

२९ नोव्हेंबर २०१४ ला पुण्यातल्या निलेश घायवळ गँग चा अमोल बढे ह्याची पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी जवळ हत्या झाली होती. ही हत्या गजानन बारणे गँग कडून करण्यात आली असा बारणे आणि त्याच्या २२ साथीदारांवर आरोप होता.

 

निलेश घायवळ हा पूर्वी बारणे गँग चा मेंबर होता. त्याने बारणे गँग सोडून आपली स्वतःची नवीन गँग उभी केली. ह्यानंतर बारणे आणि घायवळ गँग मध्ये सतत खटके उडत होते. २०१० मध्ये घायवळ गँग ने बारणे गँग मधल्या सचिन कुदळे चा गोळ्या घालून खून केला. हा खून करणाऱ्यांमध्ये अमोल बढे एक होता. ह्याचाच बदला म्हणून बारणे गँग ने २०१४ मध्ये संतोष कांबळे आणि अमोल बढे ह्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ह्या हल्ल्यात बढे चा मृत्यू झाला.

 

अमोल बढे चा खून केल्याच्या आरोपावरून गजानन बारणे आणि इतर २२ गुंडांवर पुणे विशेष सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला.

 

ह्या खटल्यात सरकारी पक्षाकडून ३४ साक्षीदार सादर करण्यात आले. ह्या ३४ साक्षीदारांनी आरोपींविरुद्ध जबाब नोंदवले होते परंतु कोर्टात साक्ष देताना ह्या सर्वांनी आपले जबाब नाकारले. कोणत्याही साक्षीदाराने, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आरोपींविरोधात साक्ष दिली नाही.

 

सरकारी पक्षाकडून खुनासाठी वापरली गेलेली हत्यारे, कपडे आणि इतर संबंधित वस्तू सादर केल्या गेल्या. परंतु केवळ तेवढेच पुरेसे नसल्याचे कोर्टाने म्हंटले. कोणीही साक्षीदार आरोपीविरोधात काहीही न बोलल्याने ह्या सर्व अरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले.

 

गेल्या ८ महिन्यात तिसऱ्यांदा पुणे पोलिसांनी गँग वर प्रकरणात कोर्टात आरोप सिद्ध करण्यात अपयश आले आहे. घायवळ गँग ची सुद्धा अशीच निर्दोष सुटका कोर्टाकडून ह्या आधी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!