पंजाब - हरियाणा उच्च न्यायालयाने मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील विवाहाच्या नियमंविषयी स्पष्टता केली आहे.
मुस्लिम पुरुष घटस्फोट न घेता एकापेक्षा जास्त विवाह करू शकतो. म्हणजेच मुस्लिम पुरुषाला एकावेळी एकापेक्षा जास्त पत्नी असणे कायद्याने वैध आहे. परंतु मुस्लिम महिलांना असा हक्क नाही. त्यांना दुसरा विवाह करायचा असल्यास मुस्लिम विवाह कायदा किंवा मुस्लिम पर्सनल लॉ नुसार घटस्फोट घेणे आवश्यक आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले.
प्रकरण काय होते?
एका मुस्लिम महिलेने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. हा दुसरा पती मुस्लिमच होता. ह्या दोघांच्या कुटुंबांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे आपल्या जीविताला धोका आहे असे त्यांचे म्हणणे होते आणि संरक्षण मिळावे ह्यासाठी त्यांनी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ह्या याचिकेत ही महिला आणि पुरुष दोघांनी मुस्लिम कायद्यानुसार आपल्याला घटस्फोट न घेता दुसरे लग्न करण्याचा हक्क आहे असे म्हंटले होते.
परंतु निकाल देताना कोर्टाने त्यांना संरक्षण नाकारले. आणि मुस्लिम महिलेला मुस्लिम पुरुषांप्रमाणे एकाहून जास्त लग्न करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये महिलांवर अन्याय करणाऱ्या अनेक तरतुदी आहेत आणि त्यावर समाजातील अनेकांकडून टीका होत असते. ह्या निमित्ताने लोकांनी सोशल मीडिया वर पुन्हा एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोड ची मागणी करायला सुरुवात केली आहे.मु