फसवणुकीच्या आरोपामुळे सनी लिओनी केरळ हाय कोर्टात
 

अभिनेत्री सनी लिओनी हिने केरळ हाय कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

 

लिओनी हिच्याविरुद्ध केरळातील एका इव्हेंट मॅनेजर ने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. क्राईम ब्रांच ने ह्या प्रकरणी रविवारी सनी लिओनी ची चौकशी केली.

 

लिओनी हिने विविध कार्यक्रमांच्या उद्घाटन समारंभाला हजर राहण्याच्या बदल्यात २९ लाख रुपये booking ammount म्हणून घेतले परंतु ती ह्या कार्यक्रमांना हजर राहिली नाही, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

 

लिओनी ने रविवारी झालेल्या चौकशी २९ लाख रुपये घेतले असल्याचे कबूल केले. परंतु तिचे असे म्हणणे आहे की ज्या कार्यक्रमांना हजर राहण्याचे तिने पैसे घेतले, ते कार्यक्रम ५ वेळा पुढे ढकलले गेले. तिने आपली कार्यक्रमांना हजर राहायची तयारी आहे असेही पोलिसांना सांगितले. परंतु हे कार्यक्रम झालेच नसल्याने आपण हजर राहिलो नाही असेही ती म्हणाली असल्याचे समजते.

 

केरळ हाय कोर्ट सनी लिओनी ला संरक्षण देते का हे बघणे आता उत्सुकतेचे असणार आहे.

One thought on “फसवणुकीच्या आरोपामुळे सनी लिओनी केरळ हाय कोर्टात

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!