कुर्ल्याच्या आमीर ला महिला आयोगाच्या सतर्कतेमुळे अटक
 

महिला आयोगाच्या सतर्कतेमुळे बलात्काराची धमकी देणारे व्हिडिओ बनवणाऱ्या कुर्ल्यातील एका तरुणाला अटक झाली आहे.

 

इंस्टाग्राम वर आमीर आणि झीशान नावाच्या दोन तरुणांनी एक अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून अपलोड केला होता. ह्यात त्यांनी महिलांना बलात्काराची धमकी दिली होती.

ट्विटर वरील काही लोकांनी महिला आयोगाला टॅग करून हा व्हिडिओ आयोगाच्या निदर्शनास आणून दिला

 

ह्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा ह्यांनी ह्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबईतील चुनाभट्टी येथील पोलिसांनी ह्या तरुणांचा पत्ता लावला. कुर्ल्यातील इद्रिस बक्षी चाळ, कुरेशी नगर येथे हे तरुण राहत असल्याचे समजले. त्यापैकी आमीर उर्फ अम्मु जावेद सय्यद ह्याला अटक झाली असून झीशान च्या शोधात पोलिस आहेत.

 

ह्या दोघांवर गुन्हा नोंदवला जात असल्याचीही माहिती महिला आयोगाच्या रेखा शर्मा ह्यांनी ट्विटर द्वारे दिली.

   

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!