राजदीप, शशी थरूर ह्यांच्या अटकेला ‘सुप्रीम’चा स्टे
 

राजदीप सरदेसाई, शशी थरूर आणि इतर आरोपींच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

 

२६ जानेवारी रोजी कृषी कायदे विरोधी आंदोलकांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. ह्या रॅली दरम्यान प्रचंड हिंसाचार आंदोलकांनी केला. त्यात एका आंदोलकांचा मृत्यू झाला. हा आंदोलक आपला ट्रॅक्टर वेगाने चालवत पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडण्याच्या प्रयत्नात होता. आणि त्यातच त्याचा ट्रॅक्टर उलटला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. परंतु काही व्यक्तींनी हा मृत्यू पोलिसांची गोळी लागून झाला असल्याची अफवा पसरवली.

 

काँग्रेस चे नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई, The Caravan चे संपादक परेश नाथ, नॅशनल हेरॉल्ड च्या मृणाल पांडे हे देखील ह्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींपैकी होते. सरदेसाई ह्यांनी तर थेट आपल्या वृत्त वाहिनीवरून आंदोलनाचे प्रत्यक्ष वृत्तांकन करताना ही खोटी बातमी दिली. ह्या सर्व व्यक्तींवर देशात वेगवेगळ्या राज्यात अनेकांनी तक्रारी केल्या आणि पोलिसांनी FIR दाखल केल्या. उत्तर प्रदेश

दिल्ली आणि इतर ठिकाणी अशा FIR दाखल झाल्या.

 

ह्या सर्व ठिकाणच्या पोलिस कारवाई पासून संरक्षण मिळावे आणि FIR रद्द व्हावा ह्यासाठी राजदीप, थरूर आणि इतरांनी  सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

आज कोर्टाने ह्या प्रकरणात नोटीस बजावली आहे. आणि पुढील सुनावणी पर्यंत ह्या आरोपींना अटक होण्यापासून संरक्षण दिले आहे.

ह्या आरोपींच्या बाजूने कोर्टापुढे बड्या वकिलांची मोठी फौज उभी होती. ह्यात कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी, श्याम दिवाण, रिबेका जॉन, राजीव नायर, प्रशांत चंद्र सेन, आर एस चीमा, करंजावला आणि कंपनी चे सिनियर पार्टनर नंदिनी गोरे आणि संदीप कपूर, आणि इतर असोसिएटस् असे सगळे होते.
 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!