दिल्ली पोलिसांनी कृषी कायदे विरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दीप सिद्धू ला आज अटक केली आहे.
कृषी कायदे विरोधी आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. ह्या रॅली दरम्यान आंदोलकांनी प्रचंड हिंसाचार केला. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर चढाई करून तेथे आपला झेंडा फडकवत राष्ट्रध्वजाचा अपमान केला. ह्या सगळ्या हिंसाचारात ३९४ पोलिस गंभीर जखमी झाले होते.
ह्या हिंसक आंदोलनाला फूस लावणाऱ्यांपैकी दीप सिद्धू एक होता. दीप सिद्धू पंजाबी सिनेमात काम करणारा अभिनेता आहे. त्याने कृषी कायदे विरोधी आंदोलनात सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याच्यावर खलिस्तानी चळवळीशी संबंध असल्याचाही आरोप आहे.
२६ जानेवारी च्या हिंसेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी १ लाखाचे बक्षीस घोषित केले होते.
आज काही त्याला पकडुन अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाला यश आले.