एल्गार परिषद: गौतम नवलखा चा जामीन अर्ज फेटाळला
 

शहरी नक्षलवाद, एल्गार परिषद, भिमा कोरेगाव हिंसाचार ह्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या गौतम नवलखा ह्याचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

 

३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषद आणि १ जानेवारी ला भडकलेली भीम कोरेगाव हिंसा ह्याचे कारस्थान रचल्याच्या आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून नवलखा ह्याला मुंबई पोलिसांनी ऑगस्ट २०१८ मध्ये अटक केली होती. ह्यानंतर हे प्रकरण तपासासाठी NIA कडे सोपवण्यात आले होते.

 

ऑगस्ट २०१८ मध्ये केलेली अटक दिल्ली हाय कोर्टाने अवैध ठरवली होती. त्यानंतर नवलखा पुन्ह अटक होण्याच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र मग उच्च आणि मग सर्वोच्च न्यायालयात गेला होता परंतु कोणत्याच कोर्टाने त्याला अटकपूर्व जामीन दिला नाही. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नवलखा ह्याला १४ एप्रिल २०२० ला पोलिसांसमोर सरेंडर करावे लागले. तेव्हापासून तो NIA च्या कस्टडी मध्ये आहे.

 

नवलखा च्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल ह्यांनी कोर्टात युक्तिवाद केला. NIA ने ९० दिवसाच्या नेमून दिलेल्या कालावधीत चार्जशीट दाखल केलेली नसल्याच्या कारणावरून कोर्टाने हा जामीन अर्ज मंजूर करावा अशी मागणी सिब्बल ह्यांनी केली.

 

परंतु जामीन देण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा ह्याचा अर्ज फेटाळून लावला.

One thought on “एल्गार परिषद: गौतम नवलखा चा जामीन अर्ज फेटाळला

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!