बजेट साठी महाराष्ट्र सरकारची ५८ लाखांची बॅग खरेदी
 

महाराष्ट्र सरकारने २९ जानेवारी रोजी एक शासन निर्णय ( GR ) जाहीर केला. हा निर्णय असा की सरकार यंदाच्या अर्थसंकल्पाची प्रकाशने वाटप करण्यासाठी ५८.८२ लाख रुपये किमतीच्या बॅग खरेदी करणार आहे.

 

विधिमंडळ सदस्य आणि इतर व्यक्तींना अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे वाटप करण्यासाठी तब्बल ८४२ बॅगा  आणि वित्त मंत्र्यांसाठी दोन लेदर च्या बॅगा अशी सगळी खरेदी सरकार ५८.८२ रुपये खर्च करून करणार आहे.

 
पण ह्यातली सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे यंदा अर्थसंकल्पीय प्रकाशने छापील स्वरूपात नसून पेन ड्राईव्ह मधून सर्वांना देण्यात येणार आहेत. मग फक्त पेन ड्राईव्ह ठेवण्यासाठी चार चाकी लगेज बॅग सरकार का खरेदी करत आहे हा प्रश्नच आहे.
  Maha govt GR  
पेन ड्राईव्ह ठेवायला प्रत्येकी ७,००० रुपये एवढी महागडी आणि मोठी बॅग कशासाठी घेण्यात येणार असेल हे कोडेच आहे.
 

हा GR वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

 

अशी बॅग खरेदी सरकारने ह्या पूर्वीही केली आहे पण तेव्हा अर्थसंकल्प छापील स्वरूपात वाटला जात असे.

 

आता आदित्य ठाकरे ह्यांच्यासारखे एक पर्यावरणप्रेमी मंत्री सरकारात असताना सरकार हजारो कागद वाया घालवून प्रत्येक सदस्याला छापील स्वरूपात अर्थसंकल्प वाटणार नाही अशी आशा सर्वांना होती. त्याप्रमाणेच सरकारने सॉफ्ट कॉपी स्वरूपात ही प्रकाशने वाटण्याचे ठरवलेले ह्या GR मधून दिसत आहे. पण मग पेन ड्राईव्ह सह प्रत्येकी एवढी महागडी बॅग सरकार का वाटणार असेल ह्या प्रश्नाचे उत्तर वित्तमंत्रीच देऊ शकतील.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!