मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांचा जामीन अर्ज वाशी कोर्टाने आज मंजूर केला आहे. राज ठाकरे स्वतः ह्या सुनावणीसाठी कोर्टात हजर होते.
२०१४ मध्ये वाशीतील एका सभेत राज ठाकरे ह्यांनी राज्यातील टोल वसुली बद्दल काही वक्तव्ये केली होती. ह्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल nakyachi तोडफोड केली होती. ह्या तोडफोडीचा राज ह्यांचे भाषण जबाबदार असल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आला होता.
ह्याच प्रकरणात कोर्टाने आज राज ह्यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजार राहण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशांनुसार राज ठाकरे आपल्या वकीलांसह आज कोर्टात हजर झाले होते
ह्याच वेळी त्यांनी ह्या प्रकरणात आपला जामीन अर्ज कोर्टापुढे सादर केला आणि कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला.