आयसिस मध्ये भरती व्हायला गेलेल्या कल्याण च्या तरुणाचा हाय कोर्टात युक्तिवाद
 

२०१४ मध्ये आयसिस ( Islamic State of Iraq and Syria) ह्या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी इराक ला गेलेल्या कल्याण च्या तरुणाची केस काल हाय कोर्टात सुनावणीसाठी होती. ही सुनावणी तीन तास चालली. आणि विशेष म्हणजे ह्या तरुणाने वकिलांची मदत न घेता स्वतःच आपली बाजू कोर्टापुढे मांडत युक्तिवाद केला.

 
अरिब माजीद अशा नावाचा हा तरुण वयाच्या २१ व्यां वर्षी कल्याण मधील इतर ३ तरुणांसह इराक ला ISIS मध्ये भरती होण्यासाठी गेले होते. ह्यापैकी अरिब सोडून इतर तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच आले होते. अरिब ६ महिन्यांनी भारतात परत आला होता. भारतात आल्या आल्याच त्याला ATS कडून अटक करण्यात आली आणि NIA च्या ताब्यात देण्यात आले.
 

अरिब विरुद्ध आयपीसी चे कलम १२५ ( आशियातील मित्र देशनविरुद्ध युद्ध पुकारणे), UAPA चे कलम १६ आणि १८ ( दहशतवादी कारवाया करणे आणि गुन्हेगारी कारस्थान ) अन्वये गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरू असून ४९ साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे.

 

हा खटला संपून निकाल लागेल विलंब होत असल्याने त्याने जामीन अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने त्याचा जामीन मार्च २०२० मध्ये मंजूर केला होता. NIA कडून ह्या जामिनाविरोधात मुंबई हाय कोर्टात अपील दाखल केले होते. ह्या अपिलावर काल सुमारे तीन तास सुनावणी चालली.

 

न्या. शिंदे आणि न्या. पितळे ह्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. ह्यावेळी आपण कोणतीही देशविरोधी कारवाई किंवा गुन्हा केलेला नाही असे अरिब म्हणाला. त्यावर कोर्टाने त्याला इराक ला कशासाठी गेला असा सवाल केला.

 
' मी फक्त २१ वर्षांचा होतो. मला तिथल्या लोकांच्या यातना बघून राहवलं नाही आणि मी त्यांना मदत करायला गेलो', असे उत्तर अरिब ने दिले.
 
' वयाच्या २१ व्या वर्षी, शिक्षण चालू असताना तू तिथल्या लोकांना मदत करायला गेलास? इथे तुझ्या आजूबाजूला दुःखी, मदतीची गरज असलेले लोक नव्हते का? तू तुझ्या आई वडिलांना किती यातना दिल्यास ह्याची तुला कल्पना तरी आहे का', असे खडे बोल त्याला कोर्टाने सुनावले.
 

मलाही गेली ६ वर्षे तुरुंगात ठेवल्याने यातना सहन कराव्या लागल्या आहेत, असे ह्यावर अरिब म्हणाला.

 

आपल्याला भारतात आणायला NIA ने च मदत केली परंतु आल्यावर लगेच अटक करण्यात आली असे त्याने कोर्टाला सांगितले.

 

त्याचा एक बंदूक घेतलेला फोटो बघून कोर्टाने त्याला सवाल केल्यावर इराक मध्ये सगळ्यांकडे बंदूका असतात. बंदूक घेतली म्हणजे गुन्हा केला असे नाही, असा युक्तिवाद त्याने केला.

 

NIA ने आपण हा खटला लवकर संपवू असे आश्वासन देत कोर्टाला जामीन नाकारण्याची विनंती केली आणि अरिब भारतात परत येण्यामागे त्याचे कारस्थान असल्याचाही दावा NIA कडून करण्यात आला.

 

तीन तास दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. २३ फेब्रुवारी ला कोर्ट आपला निकाल जाहीर करेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!