महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज नवी मुंबईतील वाशी कोर्टात हजर राहणार आहेत.
२०१४ मध्ये राज ठाकरे ह्यांनी विष्णुदास भावे सभागृहात एक भाषण केले होते. ह्या भाषणात त्यांनी टोल नाक्यांच्या लुटीविरोधत काही वक्तव्ये केली होती. त्यांच्या ह्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. ह्याच प्रकरणात प्रक्षोभक भाषण करून लोकांना हिंसा करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
ह्या प्रकरणी न्यायालयाने पूर्वी २०१७ आणि २०२० मध्ये राज ठाकरे ह्यांच्यावर समन्स बजावले होते. परंतु ते कोर्टात हजार झाले नव्हते. पुढे कोर्टाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट देखील काढला होता. अखेर कोर्टाने राज ह्यांना हजर राहण्याचे निर्देश दिल्याने आज राज ठाकरे वाशी कोर्टात हजर राहणार आहेत.
आज त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर होण्याची शक्यता आहे.
One thought on “राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार”