जम्मू काश्मीर मध्ये 4G इंटरनेट सेवा पुन्हा सुरू
 

सरकारने जम्मू काश्मीर मध्ये 4G इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

जम्मू काश्मीर च्या ऊर्जा आणि माहिती विभागाचे प्रधान सचिव रोहित कंसल ह्यांनी ट्विटर द्वारे ही माहिती दिली.

   

५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्दबातल केल्यापासून जम्मू काश्मीर मधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

 

ह्यानंतर ह्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाले.

 

इंटरनेट सेवा सुरू व्हावी ह्यासाठी सुप्रीम कोर्टात काही संघटना आणि लोकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अनुराधा भसीन वि. भारत सरकार ह्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने इंटरनेट चे महत्त्व अधोरेखित केले परंतु सरकारला इंटरनेट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले नाहीत. सरकारने ह्यावर पुनर्विचार करावा एवढे फक्त म्हंटले. दुसऱ्या एका याचिकेतील कोर्टाने सरकार ला इंटरनेट वरील बंदी उठवायचा आदेश दिला नाही.

मध्यंतरी सरकारने इंटरनेट वरची संपूर्ण बंदी उठवत 2G सेवा सुरू केली होती.

 

आज अखेर सरकारने संपूर्ण जम्मू काश्मीर भागात ४जी सेवा पुनर्स्थापित केल्याचे कळते आहे. प्रदेशातील स्थिती सुधारल्याने, अतिरेकी कारवाया कमी झाल्याने सरकारने हा निर्णय ghetl असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!