मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ३५ सरपंच निवडींना स्थगिती दिली आहे.
रोटेशन पद्धतीने आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. ह्या याचिकांच्या सुनावणीत कोर्टाने हा निर्णय घेतला.
सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, पुणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील ह्या ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीचा हा वाद होता.
ह्यावर १६ तारखेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.