शिवा नाव सांगून हिंदू मुलीला फसवणाऱ्या अख्तर ची सुटका नाही
 

दिल्ली हाय कोर्टाने आज एका अख्तर नावाच्या आरोपीविरोधात FIR रद्द करायला नकार दिला आहे.

   

ह्या अख्तर ने आपले नाव शिवा आहे असे सांगून एका हिंदू मुलीला फसवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अत्याचार केले. तिला आर्य समाजाच्या मंदिरात नेऊन लग्नाचे नाटक केले. खोटे marriage certificate तयार केले. ५ वर्षानंतर त्याचे खरे नाव अख्तर असून तो मुस्लिम असल्याचे मुलीला समजले. त्याच्या कुटुंबीयांनी तिला घरात घ्यायला नकार दिला.

 

अखेर पोलिसांनी अख्तर विरुद्ध FIR दाखल केली. त्या मुलीने देखील मॅजिस्ट्रेट समोर आपला जबाब देत सगळा प्रकार सांगितला.

 

परंतु नंतर अख्तर ने आपल्यावरील FIR रद्द करण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्यात आणि ह्या पीडित मुलींमध्ये ह्या प्रकरणात समझोता झाला असून आता तिची कोणतीही तक्रार नाही असे त्याने कोर्टाला सांगितले आणि त्यामुळे आपल्यावरील FIR quash ( रद्द) करावी अशी मागणी केली.

 

दिल्ली हाय कोर्टाने मात्र अख्तर ची ही मागणी फेटाळून लावली आहे. अख्तर वर बलात्कार, फसवणूक, खोटे marriage certificate तयार करणे असे गंभीर आरोप आहेत. त्याने शिवा ह्या नावाने एक खोटे आधार कार्ड सुद्धा तयार करून घेतले आहे. असे गुन्हे हे खाजगी स्वरूपाचे नसतात. ते संपूर्ण समाजाचे वातावरण बिघडवत असतात. आणि हे प्रकरण कौटुंबिक देखील नाही कारण आरोपी आणि पिडितेचे कायदेशीर लग्नच झालेले नाही. त्यामुळे केवळ दोघांनी सामोपचाराने तोडगा काढला म्हणून FIR रद्द करता येणार नाही, असे दिल्ली हाय कोर्टाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!